• AK

मैत्री अशी असावी...

मैत्री अशी असावी,

तुझ्या माझ्यात दिसावी .

आपण सोबत असतांना,

दिवसाची रात्र व्हावी.


मैत्री अशी असावी,

आपल्या डोळ्यात दिसावी ,

वाट मी चालत असतांना .

साथ तुझी असावी .


मैत्री अशी असावी ,

उमजली नाही तरी कळावी,

विचार तुझा करतांना,

सुखद डोळे मिटावी.


मैत्री अशी असावी ,

नेहमी बहरत रहावी.

आपण हसत असतांना,

कळ्यांची फुले व्हावी.


मैत्री अशी असावी,

जणू वात तेवत रहावी.

तुझ्या माझ्या सोबतीने ,

भविष्याची किरणे उजळावी.


मैत्री अशी असावी,

नेहमी अतूट दिसावी.

तुला मला वेगळे बघतांना,

डोळे आसवांनी भरून जावी.

177 views3 comments
Be a member of
MESSED FORCE

Welcome to MESSED FORCE!